राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची नाराजी दिला राज्यमंत्री पदाचा राजीनामा
Read Time55 Second
मुंबई – राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रावादी काँग्रेस आणि काँग्रेस या घटकपक्षामधील अनेक नेत्यांची नाराजी समोर आली होती. आता मंत्रिमंडळात स्थान मिळूनही केवळ राज्यमंत्रिपद मिळाल्याने शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण अब्दुल सत्तार यांची समजूत काढण्यासाठी शिवसेना नेते अर्जुन खोतकर हे दाखल झाले आहेत.अशी माहिती समोर आली आहे अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.