अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-लिटिल जंक्शन इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या कला,कौशल्यास व व्यक्तिमत्त्व विकासास वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमाचे उदघाटन प्रसिद्ध वक्ते व पत्रकार दिनेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे लिटिल जंक्शन स्कुल च्या प्रिन्सिपल लुबना सय्यद यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन,वाहतूक दळणवळण,आपली संस्कृती, सण,उत्सव,ज्ञानेंद्रिये या विषयावर प्रकल्प बनवून त्याची माहिती स्वतः सांगितली,या स्पर्धेचा निकाल उपस्थित पाहुणे व पालक यांच्या गुप्त पसंतीनुसार काढण्यात येत असल्याचे प्रिन्सिपल यांनी सांगितले,हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी वर्ग शिक्षकांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले,या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते