शिक्षण सेवकांच्या मानधनात होणार वाढ,कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या मागणीला यश : गौतम कांबळे राज्याध्यक्ष

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-शिक्षण सेवकांच्या मानधनात होणार वाढ,कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या मागणीला यश : गौतम कांबळे राज्याध्यक्ष
शिक्षण सेवकांच्या मानधनात २५ हजार रुपयाची वाढ करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री ,शालेय शिक्षण मंत्री ,शिक्षण सचिव ,प्राथमिक /माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक , शिक्षण आयुक्त यांच्याकडे केली होती .शिक्षण परिषदेने राज्य सरकारकडे २१ हजार रुपये मानधन वाढ करण्याची शिफारस केली होती .या विषयावर निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांकडे बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये शिक्षण सेवक (प्राथमिक ) कृषी सेवक ,आरोग्य सेवक , ग्रामसेवक यांना १६ हजार रुपये मानधन वाढ करण्यात आले आहे .शिक्षण सेवक माध्यमिक यांना १८ हजाररुपये वाढ करण्यात आले आहे वशिक्षण सेवक उच्च माध्यमिक यांच्या मानधनात २० हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे .महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या प्रयत्नामुळे आरोग्य सेवक ग्रामसेवक व शिक्षण सेवक यांना वाढीव मानधन लवकरच देण्यात येणार आहे .अशी माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे, राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे , पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण व हवेली तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड हे पदाधिकारी उपस्थित होते .