शैक्षणिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कटिबध्द किशोर पाटील कुंझरकर यांचे प्रतिपादन

Read Time5 Minute, 5 Second

जालना(प्रतिनिधी): जिल्हा परिषद तसेच माध्यमिक,राज्य शासन व जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तसेच सर्वस्तरीय शिक्षकांचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ या नोंदणीकृत शिक्षक संघटनेचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर रविवारी केले. राज्य कार्यकारणी व विभागीय उपक्रम खानदेश मराठवाडा औरंगाबाद विभाग चिंतन मेळाव्यात प्रमुख वक्ते म्हणून जालना येथे ते बोलत होते.व्यासपीठावर अध्यक्षस्थानी शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक अर्जुनराव साळवे होते. यावेळी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुणराव जाधव जालना यांनी संघाची ध्येयधोरणे स्पष्ट केली. व्यासपीठावर पी यु अर्सुड, अच्युत साबळे परमेश्‍वर साळवे विलासराव इंगळे यांनी मनोगत केले. प्रमुख वक्ते म्हणून पुढे बोलताना राज्यातील शिक्षक संघटनांची अभ्यासू व मुलुखमैदान तोफ राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की,शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये यासाठी मागील सरकारच्या काळात देखील राज्य समन्वयक या नात्याने आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आताही आपण नवीन शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ,यांच्याशी संवाद साधला आहे आगामी काळात शिक्षकांची अडीचशेच्या वर अशैक्षणिक कामे कमी करण्यावर राज्य समन्वय समिती व समता शिक्षक संघाच्या वतीने भर असून प्राथमिक ते सर्व शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत. राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे साहेब व सर्व मंत्रिमंडळाला आपण यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी भाग पाडू. शिक्षक हितासाठी जे चांगले करता येईल तेथे करण्याच्या संदर्भात राज्यातील शिक्षकांच्या पाठीशी असून महाराष्ट्र राज्यात राज्यस्तरीय शिक्षक संघटनांच्या सर्वांनी एका आणि एकाच फोरम वर एकत्रित रित्या काम करणे नितांत गरजेचे आहे असे यावेळी बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने लवकरच अधिवेशन घेण्यात येणार असून यासंदर्भात मंत्रालय स्तरावर राज्याध्यक्ष अरुण जाधव यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव नियोजित असून विविध प्रश्नांच्या संदर्भात लवकरच आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार आहे. जुनी पेन्शन योजना संदर्भात महा विकास आघाडीचे राज्याचे ज्येष्ठ नेते नामदार शर भद पवार साहेब यांना पालक मंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून भेटून पाठपुरावा करणार असल्याचेही या मेळाव्यात बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले. अध्यक्ष म्हणतात अर्जुनराव साळवे यांनी केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक प्राथमिक शिक्षक सर्वांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच राज्यस्तरीय मीटिंग आयोजित करण्याचे सूतोवाच केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता-महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Next post पर्यावरण, आरोग्यासाठी एकवटले सायकलप्रेमी प्रदूषणमुक्त भारत’ संदेश देण्यासाठी सायकल प्रवासातून घातला जातोय आदर्श
error: Content is protected !!
%d bloggers like this: