तांदुळवाडी(भडगाव) :जि. प. मराठी मुलांची शाळा तांदुळवाडी येथे सांस्कृतिक वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम करण्यात आले त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अण्णासाहेब कोमल सिंग पाटील जि. प. केंद्र प्रमुख कजगाव, यांनी स्वीकारले. सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन श्रीफळ अर्पण व मूल्य आपण केले. सरस्वती मातेचे पूजन करताना लक्ष्मीबाई गायकवाड सरपंच, प्रमुख पाहुणे सुनील महाजन जी सर कन्याशाळा कजगांव, डॉ. आर आर डी निकम सर उपस्थित होते. त्याप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री जयवंतराव पाटील, पोलीस पाटील किरण बागुल, देशदूतचे वार्ताहार प्रल्हाद पवार, बाबुराव पवार, दादाभाऊ पाटील, सुभाष पाटील, पितांबर महाजन, दिलीप पवार, हिरालाल महाजन, सिद्धार्थ बागुल अशा काही मान्यवरांचे सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली,
लहान बालकांनी पवन ईशसतवन म्हणून कार्यक्रमाला सुरुवात केली. बालविवाह व हुंडाबळी यावर एक नाट्य सादर करण्यात आले, तसेच गरीब शेतकऱ्यांची शासकीय कर्मचारी कशा पद्धतीने लूटमार करतात त्या शेतकऱ्यांची कशी पिळवणूक होते यावर आधारित देखील अर्धा तासाचे एक नाट्य हुबेहूब लहान बालकांनी शेतकऱ्यांसमोर सादर करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अथवा पालकांच्या डोळ्यातून अश्रू आलेल्या मातांच्या डोळ्यातून अश्रू भराभर अनावरण झाले,
आदिवासी वस्तीतील राहणारी विद्यार्थिनी इयत्ता चौथी आई माझी मायेचा सागर’ ” हंबरून वासराले चाटते जशी गाय” या गाण्यावर ॲक्शन करून माता भगिनींच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले, तसेच लहान कलाकारांनी नृत्य सादर केले, परिसरातील कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने खेड्यातील लोकांची व गावातील ग्रामस्थांची उपस्थिती पाहून मान्यवरांनी बालकलाकारांचे कार्यक्रमाला रोख स्वरूपात व शरद पाटील यांनी अशा कलाकारांना मेडल देखील बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिले,
जेणेकरून एक ते चार वर्गांना प्रेरणा मिळेल म्हणून जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा मुख्याध्यापक रवींद्र बोरसे सर, प्रशांत चव्हाण सर, नयना पाटील मॅडम व शालेय शिक्षण कमिटी अध्यक्ष वसंत पाटील तसेच शिक्षण कमिटी सदस्य यांनी मोठा श्रमाचा वाटा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना लहान बालकलाकारांना कार्यक्रमाची शोभा वाढवली,
त्यात शालेय पोषण आहार कमिटी, सदस्य, परिसरातील शिक्षक वृंद, गावातील ज्येष्ठ नागरिक, नवतरुण तसेच पालकांनी देखील अनमोल सहकार्य लाभले.
Read Time3 Minute, 51 Second