MSEDCL(महावितरण) चे कर्तव्य दक्ष कर्मचारी
अधिकार आमचा(विशेष): दिनांक २५ जानेवारी २०२० रोजी संध्याकाळी विजेच्या खांबावर शॉर्टसर्किट मूळे आग लागून विजेच्या खांबावरील वायरी जाळून पंचशील नगर चाळीसगाव या भागातील विद्युत प्रवाह बंद होतो,लागलीच प्रभागातील नागरिकांनी महावितरण कार्यालय येथे फोन करून काळविल्यानंतर काही वेळात कर्मचारी पंचशील नगर मध्ये येऊन रात्री अंधारात विद्युत विजेच्या खांबावर चढून सर्व वायरी व्यवस्थित लावून विद्युत प्रवाह काही वेळात सुरळीत करतात व प्रभागातील नागरिकांच्या चेहर्या वर आनन्द दिसतो,काही कारण पुढे न करता आपले काम प्रामाणिक पणे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ,सालाम आहे त्या कर्मचाऱ्यांना जे आपले काम मनाने पूर्ण करतात व लोकांच्या समाधानात समाधानी होतात त्या कर्मचाऱ्यांचे नाव कळू शकले नाही पण त्यांच्या कार्याने पुन्हा महावितरण कर्मचाऱ्यांच्या कार्याचे नाव उंच करण्याचे कार्य मात्र नक्की केले आहे .