अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक निर्मिती महाराष्ट्र शासनाने करण्यासाठी जनहितार्थ निवेदन 19 जुन 2024 रोजी देण्यात आले आहे. दि19जुन 1938(आज 86 वर्षे होत आहे) आणि दि.23 ऑक्टोबर 1929 (आज 95 वर्षे होत आहे) या दोन्ही दिवशी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दिन बंधू आंबेडकर बोर्डिंग घाट रोड चाळीसगाव ,नगर भूमापन क्रमांक 3314/1 क्षेत्र 245 चौ.मी.सदर जागेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा स्मारक निर्मिती महाराष्ट्र शासनाने करावी कारण महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जेथे जेथे भेटी दिलेल्या त्या जागेवर 125 व्या जयंतीनिमित्त स्मारक बांधले उदा.कंडारी भुसावळ येथे 48 कोटी रुपये मंजूर करून,जेतवन बुद्ध विहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्मिती करण्यात आली तसेच संपूर्ण गावात रस्ते, गटारी तयार करण्यात आले आहे मात्र चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर 1924-1951 दरम्यान 6 वेळा प्रत्यक्षात भेट दिली तरी सुद्धा त्या संदर्भात कोणतेही स्मारक बांधण्यात आले नाही ही खेदाची बाब आहे निषेधार्थ आहे.
शासनाने दरवर्षी 19 जुन डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा स्थळ दीन बंधू आंबेडकर आश्रम बोर्डिंग घाट रोड चाळीसगाव येथे साजरा करू पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे त्यांचा विकास करण्यासाठी शासनाने मुल, मुलींना बोर्डिंग, जिमखाना, ग्रंथालय, बुद्ध विहार अशी एकुण 4/5 मजली इमारतीची निर्मिती व देखभाल करावी . 95 वर्षांपासून हे स्थळ विकासापासून दुर्लक्षित आहे महाराष्ट्र शासनाने यांची गंभीर दखल घ्यावी असे न केल्यास शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11-00 वा. चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी व इशारा म्हणून एक दिवसीय एल्गार धरणे आंदोलन करणार आहोत याची नोंद शासनाने घ्यावी असा इशारा खान्देश जन आंदोलन खान्देश विभागाच्या वतीने देण्यात आले आहे
