oplus_2097154
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील हनुमानवाडी परिसरात रेल्वे पुलाखाली रविवारी रात्री अंदाजे १० वाजेच्या सुमारास गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत सिकंदर शेख या तरुणाच्या खांद्याला गोळी लागून तो जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी परिसरातील रेल्वे पुलाखाली अज्ञात व्यक्तीने सिकंदर शेख याच्यावर गोळीबार केला. यात त्याच्या खांद्याला गोळी लागल्याने तो जखमी झाला. जखमी सिकंदर शेख याला तातडीने उपचारासाठी देवरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून परिसराची पाहणी करत तपास सुरू केला आहे. गोळीबार नेमका कोणत्या कारणावरून व कोणाकडून करण्यात आला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे हनुमानवाडी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
