संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधिक्षक यांचे तसेच अपर पोलीस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली रेकॉर्ड वरील गुन्हेगारांच्या हालचालीवर रात्रगस्त व पेट्रोलींग दरम्यान नजर ठेवुन त्यांना दररोज चेक करण्यात येते.
चाळीसगाव (प्रतिनिधी)- दि २ जुलै रोजी रात्री १ वाजून ३० मिनिटांनी शहर पोलिसांची धाडसी कारवाई बनावट पिस्तूल सह दोन आरोपींना अटक करत भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीस निरीक्षक, संदिप पाटील,पी एस आय योगेश माळी, सफौ विश्वास पाटील, सफौ शशिकांत महाजन, पोहेकॉ नितीन वाल्हे, पोहेकॉ विनोद भोई, पोकॉ चत्तरसिंग महेर, पोकॉ आशुतोष सोनवणे, पोकॉ रमेश पाटील, पोकॉ समाधान पाटील असे रात्रगस्त पेट्रोलींग करीत असतांना पोहेकॉ नितीन वाल्हे व विनोद भोई यांना गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की एका काळया रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर शहरात दोन इसम संशयित रित्या फिरत आहेत.त्यावरून अधिकारी व कर्मचारी यांनी चाळीसगाव शहरात रात्री दीड वाजेच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन जवळील रोडवरून आरोपी भाग्यवान(माया) लक्ष्मण गायकवाड वय २४ वर्ष राहणार चिकुंदरा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद व त्याच्यासोबत विकास संपत मस्के वय २५ वर्ष राहणार बालाजी नगर,आशा टेलर समोर,भोसरी पुणे या दोघांना ताब्यात घेत झडती घेतली असता त्यांच्याजवळ गावठी बनावटीच्या २ पिस्तूल,४ जिवंत काडतूस,२ मॅक्झिन, बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच २४ ए झेड ६१८६ असा एकूण १ लाख २२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला दोन्ही आरोपींवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं २८९/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,२९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१),(३) चे उल्लंघन तसेच १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय योगेश माळी पो विनोद भोई पोलीस पोकॉ कल्पेश पगारे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे.
भाग्यवान लक्ष्मण गायकवाड उर्फ माया हा सराईत गुन्हेगार असून त्यावर
1) तुळजापूर पो स्टे येथे 174/2022 भादंवि 307,326,34, हत्यार कायदा 03,25,27 अन्वये ,
2) नळदुर्ग पो स्टे येथे 199/2020 भादवी 307,367,34 अन्वये व
3) लोणी काळभोर पो स्टे पुणे ग्रामीण येथे भादवी 363 प्रमाणे असे एकूण 03 गुन्हे दाखल आहेत
