अधिकार आमचा न्युज नेटवर्क संपादक गफ्फार शेख (मलिक) चाळीसगाव(प्रतिनिधी)-सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या (R.K.S.) कार्यकारी समितीवर योगेश अर्जुन गव्हाणे यांची प्रतिष्ठित नागरिक म्हणून सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच संदर्भीय शासन निर्णयान्वये रुग्ण कल्याण समितीच्या संरचनेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यातील ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्ण कल्याण समितीच्या कार्यकारी समितीत प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या अनुषंगाने योगेश अर्जुन गव्हाणे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे रुग्णालयाच्या कामकाजात लोकसहभाग वाढविण्यासह रुग्णांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान देण्याची संधी त्यांना मिळणार आहे. त्यांच्या या निवडीमुळे राजकीय,सामाजिक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून पदाला न्याय देण्याचा आणि गोरगरीब रुग्णांच्या हितासाठी कार्य करणार असल्याचे योगेश गव्हाणे यांनी यावेळी सांगितले. About The Author admin पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772 See author's posts Views: 51 Post navigation वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी १५ हजारांची लाच घेताना महावितरणचे ३ अधिकारी-कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात