अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरात मुलींच्या छेडछाड होण्याच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे शाळा,महाविद्यालय परिसरात टवाळखोर घोळका करत उभे राहत असतात,आता तर एक अल्पवयीन मुलगी घराबाहेर भांडे धुवत असताना तिचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलगी आपल्या घराबाहेर भांडे धुवत असताना दोन अनोळखी मुलांपैकी एकाने तिचे तोंड दाबत दुसऱ्यांना तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने मुलीने आरडा ओरड केल्याने वडील व काका यांनी घराबाहेर येत त्या दोन्ही मुलांना पकडण्याचा प्रयत्न केला,मात्र एक तेथून पसार झाला पसार झालेल्या मुलाने विनयभंग केला असल्याचे कळते.
१० मार्च रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४ व बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८.१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलिस पुढील तपास करीत आहे.
शहरातील निर्भया पथक पुन्हा सक्रिय करावे
शहरातील निर्भया पथक सद्या कारवाया करतांना दिसून येत नाही पूर्वी ही पथक शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात फिरणाऱ्या टवाळखोरांना चांगलीच अद्दल घडवत होते ते आता पुन्हा सक्रिय करणे गरजेचे असून शाळा व महाविद्यालय परिसरात पुन्हा नजर ठेवणे अत्यंत गरजेचे झाले आहे,विनाकारण शाळा व महाविद्यालय परिसरात घोळका करून टवाळखोरी करणाऱ्या टवाळखोरांचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.शहरातील निर्भया पथक पुन्हा सक्रिय करावे.
