इंदापूर तालुक्याच्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकरी यांची बैठक,लवकरच रिक्षा धावणार?

Read Time2 Minute, 16 Second

अधिकार आमचा न्यूज पोर्टल

दौंड प्रतिनिधी पवन साळवे

“दौंड रिक्षा महासंघ” गुरूवार दि.28/5/20 रोजी सकाळी 11.30 बारामती उप- प्रादेशिक परीवहन (R.T.O).विभाग या ठिकाणी मा.श्री.प्रशांत (नाना) सातव यांच्या वतीने दौंड, बारामती ,इंदापूर तालुक्याच्या रिक्षा संघटनांच्या पदाधिकरी यांची बैठक प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.धायगुडे साहेब,मा.साखरे साहेब,मा.मुळे साहेब ,मा शिंदे साहेब,
बारामती येथील मा.श्री प्रशांत (नाना)सातव तसेच आपल्या दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक मा.प्रा.डॉ.भिमराव मोरे सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .यावेळी रिक्षा चालकांनी घ्यावयाची काळजी आणि नियम सर्वांना समजावून सांगितले आणि त्या संदर्भाचं पत्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रकाशित केले आहे त्या पञकाच्या प्रती श्री नाना सातव मित्र परिवार यांच्या वतीने रिक्षा चालकांसाठी देण्यात आले व प्रशासन आपणास मदत व सहकार्य तसेच रिक्षा चालकांना रिक्ष व्यवसाय सूरू करण्याबाबत लवकरच आनंदाची बातमी
देणार असल्याचे सांगितले.
तसेच या बैठकीस दौंडमधून दौंड रिक्षा महासंघाचे संस्थापक मा.प्रा.डॉ.भिमराव मोरे सर ,यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडमधून बाबासाहेब कोरी ,गौतम गायकवाड ,हिरा अयवळे तसेच उत्तम लोंढे उपस्थित होते. शेवटी मोरे सरांच्या वतीने रिक्षा चालकांच्या हिताचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले व ते लवकरच सोडवण्याचे आश्वासन परिवहन अधिकऱ्यांनी दिले.

6 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

दौंड शहरात पोलीस प्रशासन घेत असलेल्या मेहनतीचे फळ दौंड शहरात कोरोनाचा रुग्ण आजून तरी नाही

Read Time3 Minute, 44 Second

दौंड:आजची नाजूक परिस्थिती पाहता कोरोना वायरस ने जगभर हाहाकार माजवला आहे इटली,फ्रांस, इराक,चीन,अमेरिका,या प्रगतशील देशालाही हतबल केले आहे,प्रत्येक देश कोरोना वायरसपासून देशाची जनता कशी निरोगी राहिल यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे.भारत देशही या कोरोना वायरसच्या विळख्यात अडकला आहे केंद्र आणि राज्यसरकार युद्धपातळीवर काम करत आहेत व उपाययोजना करण्यात वेळ खर्ची घालत आहे.महाराष्ट्रामध्येही रुग्णांची संख्या अधिकाधिक वाढत आहे.मुंबई,पुणे,बारामती,मालेगाव आणि अन्य जिल्ह्यामध्येही त्याचा प्रादुर्भाव मध्ये वाढ होत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलीस,डॉक्टर,गटविकास अधिकारी, मुख्यधिकारी,व तालुका आरोग्य अधिकारी-डॉ अशोक राजगे व RH चे डीन डॉ. डांगे व सर्व सरकारी यंत्रणा स्वयंसेवी संस्था निस्वार्थ पणे काम करत आहेत.मुख्यता बाब म्हणजे पुण्याजवळील असणारे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका याठिकाणी अद्यापही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही दौंड तालुक्यातील सर्व स्थानिक प्रशासन उदा:दौंड नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलिस, व अन्य विभागातील कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत.दौंडमध्ये एकही रुग्ण ना आढळण्याचे कारण म्हणजे सर्व प्रशासन पण पोलीस प्रशासनाची कामगिरी खूप अमूल्य आहे,जे योगदान पोलीस प्रशासन करत आहे ते अविस्मरणीय आहे जनसामान्यांना त्रास होऊ नये आपल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून कठोर निर्णय घेऊन कार्य करण्याचे जे जे सत्र चालवले आहे,कधी प्रेमाने तर वेळ पडल्यास काठी चा आधार घेत पोलीस प्रशासन दौंडमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांचे चेक पोस्ट वर कसून तपासणी करत आहे व त्यानंतर दौंडमध्ये त्यांना प्रवेश दिला जातो.डी वाय एस पी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या कडक शिस्तीची अंमलबजावणी व पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या नेतृत्वात कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता मोकाट फिरणाऱ्यावर कडक कारवाई केली जाते याच त्यांच्या कामगिरीमुळे दौंड शहर सुख समृद्धीत आहे.डी वाय एसपी ऐश्वर्या शर्मा व पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक यांच्या कर्तव्यदक्ष व शिस्तबद्ध पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. हा लेख माझ्या सर्व पोलीस बांधवाबद्दल असणाऱ्या कामगिरीला अर्पण.

कु:पवन गौतम साळवे अधिकार आमचा न्यूज पोर्टल चॅनल दौंड प्रतिनिधी-8390888681.हर्षल पाटोळे-8888741743

14 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

लॉकडाऊन म्हणजे कर्फ्युच आहे-प्रधानमंत्री मोदींची घोषणा

Read Time1 Minute, 44 Second

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हा 21 दिवसाचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे जर हे 21 दिवस आम्ही स्वतःला सांभाळले नाही तर देश 21 वर्ष मागे जाऊ शकतो लोकडाऊन चा कालावधी 21 दिवसाचा असेल तसेच लॉकडाऊन म्हणजे कर्फ्युच आहे तरी तुम्ही जिथे आहेत तिथेच राहा,रस्त्यावर फिरु नका,एकमेकांशी दूर राहणे यांच्या व्यतिरिक्त कोरोनाशी वाचण्याचा दुसरा पर्याय नाही, एकमेकांशी दूर राहणे हे सर्वांनसाठी आहे फक्त रुग्णांसाठी नाही काही लोकांचे विचार, हलगर्जी पणा तुम्हाला,तुमच्या नातेवाईकांना,तुमच्या मित्रांना,आपल्या देशाला खूप घातक असू शकतो म्हणून आज रात्री 12 वाजे पासून संपुर्ण भारतात लॉकडाऊन केले जात आहे हा लॉकडाऊन तुम्हाला वाचविण्यासाठी,तुमच्या मित्रांना वाचविण्यासाठी,तुमच्या नातेवाईकांना वाचविण्यासाठी हे पाऊल उचलत आहे तरी आवश्यक असल्यास घराबाहेर निघा तसेच या 21 दिवसाच्या कालावधी मध्ये तुम्ही कोरोना च्या विरोधातील लढाई जिंकाल अशी आशा आहे. तुम्हाला हात जोडून विनंती करतो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी.

4 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

24 मार्च जागतिक क्षयरोग दिन विशेष

Read Time1 Minute, 34 Second

अधिकार आमचा विशेष:-क्षयरोगातून बचावलेल्या ज्यांचे एकच फुफ्फुस शिल्लक आहे. अश्या व्यक्तींना कोरोना या विषाणूचा धोका जास्त आहे कारण हा विषाणू फुफ्फुसावर हल्ला करतो.क्षयरोगावर मात करणारे किंवा अजूनही क्षयरोगानं ग्रासलेलेल हजारो लोक काहीशा तणावाखाली आहेत. कारण कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या आजाराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या व्यक्तीं मध्ये त्यांचा समावेश आहे, 24 मार्च म्हणजे जागतिक क्षयरोग दिन. अर्थात ट्युबरक्युलॉसिस म्हणजे टीबीविषयी जागरुकता निर्माण करणारा दिवस. या दिवसाच्या निमित्तानं आणि कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर भारतात, विशेषतः मुंबईमध्ये या आजाराचा धोका आजही कसा टिकून आहे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे तसेच शासनाने नियोजित केलेल्या संचारबंदी मध्ये आपला सहभाग असायला हवा आपण सर्वांनी भारतीय म्हणून आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे पेलायला हवी आपण स्वतः जागरूक होऊन समाजाला जागरूक करणे गरजेचे आहे.

.

2 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

माजी आमदार रमेश किसन थोरात यांच्या प्रयत्नाला यश दौंड पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी ७ कोटींचा निधी मंजूर

Read Time1 Minute, 24 Second

दौंड(प्रतिनिधी):-दि २० माजी आमदार रमेश किसन थोरात यांच्या प्रयत्नाला यश दौंड पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी ७ कोटींचा निधी मंजूर

माजी आमदार रमेश किसन थोरात, सभापती आशा शितोळे,पंचायत समिती दौंड उपसभापती नितीन दोरगे,जिल्हा परिषद सदस्य मा:वीरधवल बाबा जगदाळे यांच्या प्रयत्नातून दौंड पंचायत समिती नूतन ईमारतीसाठी निधी मंजूर झाला आहे
दौंड शहरात मध्यवर्ती ठिकाणी पंचायत समिती नुतन ईमारत होण्याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी दिला हिरवा कंदील वेळोवेळी पाठपूरावा करत असताना दादांनी मा.ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ यांना शिफारस करत ७ कोटी रूपयांच्या या कामास प्रशासकिय मंजूरी मिळाली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब तसेच ग्रामविकास मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांचे दौंड तालूक्यातील जनतेच्या वतीने जाहीर आभार

4 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

टिक टॉक विडिओ केला,चालक घरी गेला?कारवाही योग्य की अयोग्य?

Read Time1 Minute, 20 Second

अधिकार आमचा (विशेष)- पीएमपी च्या ई बस चालक भीमराव गायकवाड यांना टिक टॉक व्हिडिओ तयार केले म्हणून बडतर्फ करण्यात आले, बातमी कळताच मनात विचार आला की हे योग्य आहे की अयोग्य माहीत नाही पण कर्मचारी पण शेवटी माणूसच ना म आजच्या या इंटरनेट च्या युगात तर आमच्या आतील कलाकार बाहेर येणारच आणि जर थोडी कलाकारी केली त्यामुळे जर नोकरी जात असेल तर नक्की विचार करावा लागेल बेकराई डेपोत बस उभी आहे आणि जवळ पास कोणी नाही जर हा प्रकार चालू बस मधील असता तर कदाचित हा निर्णय योग्य असता पण निवांत वेळेत केलेली कलाकारी आणि चालक ला बडतर्फ करण्यात आले या प्रकारे या प्रकरणाने प्रशासनाची प्रतिमा मलिन होऊ शकते असे परिपत्रकात म्हटले आहे व प्रवाश्यांनी पण बस मधे विडिओ काढू नये असू सांगण्यात आले आहे

आपले मत कमेंट मध्ये जरूर कळवा

चालक भीमराव गायकवाड

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

कांदा, कांदा, कांदा

Read Time1 Minute, 57 Second

अधीकार आमचा विशेष: कांदा,कांदा, कांदा सद्या कांद्यामुळे लोकांच्या डोळ्यात पाणी आले आहे ,असे लोकांमधून सूर निघू लागले आहे, आणि हो ही लोकं कोणी दुसरी नाही आम्हीच आहोत जी अति पावसामुळे शेतकाऱ्यांचे नुकसान झाले होते तर त्यांच्या साठी भावनिक झालो होतो ,मदतीच्या गोष्टी करत होतो, म आज मदत करायची वेळ आली आहे तर डोळ्यात पाणी येते समजायला मार्ग नाही नेमकं आम्ही शेतकऱ्यांचे हीत पाहतो की नुसत नाटक करतो एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे ,या प्रश्नावर आम्ही चिंतन करण्याची गरज आहे,नुसतं कांद्याचे भाव वाढले ओरडत फिरत आहोत पण भाव का वाढले असतील हा विचार नाही केला पण आम्हला काय आम्हाला तर शेती माल स्वस्त हवा आहे ,मॉल मध्ये १७९ रुपयात ९५० ग्राम टमाटर स्वास घेतो तेही १०% डिस्काउंट मध्ये हसत हसत पण टमाटर काय किलो आहेत ,फायदा झाला की तोटा विचार करत नाही, पण भाजी पाला थोडा महागला की खूप विचार येतात मदत करायचीच होतिना म खा थोडं महाग काय फरक पडणार आहे पण आमच्या देशातील शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना फरक पडेल त्यांना त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळेल बस एवढेच सांगू इच्छितो की रडणं सोडा समाधानाने रहा कोणी एकटा एकाची मदत करू शकत नाही पण आम्ही सर्व मिळून एकाची नक्कीच मदत करू शकतो.

0 0
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleppy
Sleppy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %