Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

बी ई मॅकेनिकल इंजिनिअरने नोकरी न करता व्यवसाय निवडला, उभा केल्या १९ “शाखांचा” मिसळ कट्टा

0
4 0
Read Time7 Minute, 54 Second

अधिकार आमचा विशेष

युवराज काळे यांची यशोगाथा

सोलापूर : सध्या मार्केटमध्ये मिसळचा पूर आला आहे. अनेक लोक मिसळच्या अनोख्या चविची जाहिरात करतात. या सारखी चव तर दुसरीकडे नसल्याचाही दावा करतात. मात्र, वास्तवात चविचा आणि मिसळचा एकमेकाशी दुरान्वये संबंध नसतो. वेगवेगळ्या मार्केटिंगच्या क्लुप्त्या वापरून आपली मिसळ मात्र, जोरात विकत असतात. मग ते कधी आपल्या मिसळचे डिश सजवतात तर कधी डिशमध्ये काहीतरी स्वीट देऊन वेगळे काही देत असल्याचा दिखावा करतात. किंवा एक छानसं हॉटेल सजवून त्यात मिसळ विकून ग्राहकांना सगळ्यात बेस्ट मिसळ दिल्याच सांगतात. मात्र वास्तवात असं असतं का ? हे मिसळ खाल्ल्यानंतर लोकांची निराशा होते.

मात्र सोलापूर जिल्ह्यातल्या लहानशा खेड्यातून एका मिसळचा उदय झाला. आणि बघता बघता सगळीकडे या मिसळची चर्चा सुरू झाली. तसा मिसळ म्हटले की लोकांच्या डोळ्यासमोर कोल्हापूर येतं किंवा नाशिक तरी आठवतं. पण मी तुम्हाला पुन्हा सांगतोय की सोलापूर जिल्ह्यातील एक मिसळ महाराष्ट्रभर धुमाकुळ घालतीय. चवीनं खाणाऱ्यांसाठी म्हणलं की लोकांच्या डोळ्यासमोर मिसळ कट्टा येतोय. इतकी सवय लोकांना या मिसळची झाली आहे.

होय मी मिसळ कट्टाच्या विविध मिसळ बद्दल बोलतोय. मिसळ प्रेमी अक्षरश: मिसळ कट्टाबद्दल भरभरून बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. अनेकांनी हे व्हिडिओ पाहिल्यानंतर वास्तवामध्ये मिसळची चव अशीच आहे का ? हे बघायला लोकं मिसळ कट्टावर जाऊन मिसळ खातात. त्यानंतर त्यांचीही प्रतिक्रीया ‘लयभारी, नादखुळा, अप्रतिम मिसळ, भन्नाट मिसळ’ अशीच असते. अगदी गुगलवर “बेस्ट मिसळ इन पुणे,” असं सर्च केलं तरी गुगल तुम्हाला कर्वेनगरचं मिसळ कट्टाच सुचवते. मिसळ कट्टाच्या पेजवर १६७० लोकांनी चवीबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर गुगल रेटींग ४.२ आहे. सोशल मीडियावर लोकं भरभरून मिसळ कट्टाबद्दल लिहतात.

महाराष्ट्रभर मिसळ कट्टाच्या सध्या १९ शाखा आहेत. फ्रेंचाइजी मॉडेलवर मिसळ कट्टा काम करतं. या माध्यमातून प्रतिवर्षी तब्बल नऊ ते दहा कोटीची उलाढाल होते. आगामी काळात मिसळ कट्टा देशाच्या सीमा ओलांडून परदेशात जाणार आहे. लवकरच मिसळ कट्टाची नेदरलॅंड व दुबई येथे शाखा होणार आहे. हे नक्कीच अभिमानस्पद आणि कौतुकास्पदही आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब या छोट्याशा गावातील युवराज काळे यांनी मिसळ कट्टा या मिसळ एक छोटेसे हॉटेल कर्वेनगर पुणे येथे सुरू केलं. खरतर युवराज पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता पण शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी काय करता येईल असा विचार करून त्यांनी सुरुवातीला आपल्याच घरी बनतं असलेल्या मिसळचा मसाला घेवून पुण्यात मिसळ कट्टाची सुरवात केली. ९ फेब्रुवारी २०१७ रोजी कर्वेनगर पुणे येथे मिसळ कट्टा सुरू झाला.त्यानंतर सुरू झाला मिसळ कट्टाचा यशस्वी प्रवास !

मिसळ कटाच्या सुरुवातीबद्दल सांगताना युवराज भावूक झाला होतो,. तो म्हणाला, “ पुण्यात मिसळ कट्टा सुरू करताना मनात शंका वाटत होती, की पुणेकरांना ही मिसळ आवडेल की नाही. मिसळ कशी बनवायची हे लहानपणापासूनच मी बघत होतो. कारण आमच्या घरी हॉटेल होतं. आणि माझे बाबा हॉटेलमध्ये मिसळ बनवायचे. अगदी माझ्या जन्माच्या अगोदर पासूनचे हॉटेल. १९७२ साली त्याची सुरवात केली होती. त्यावेळेपासून मिसळ बनवली जातं होती. त्या चविच्या जोरावर एका हॉटेलचे दोन हॉटेल झाले. आम्हा भावंडाचं शिक्षण त्याच्यावर झालं.”

मिसळ बद्दल बोलता बोलता युवराजने आपला जीवनपट उलगडून दाखवला. घरचं हॉटेल असल्यामुळे लहानपणापासूनच युवराजला किचनमध्ये लुडबुड करण्याची सवय लागली. त्यातून त्याला वेगळ्या चवीचे पदार्थ बनवण्याची शिक्षण मिळत गेले. पुढे हीच सवय कामी आली. त्या ज्ञानाचा वापर करून युवराजने मिसळ अनेक प्रकारांच्या मिसळला जन्म दिला. जसं की काळ्या रस्सा मिसळ, तांबडा रस्सा मिसळ, बाजार आमटी मिसळ, जैन मिसळ, कडी मिसळ, पुरी मिसळ आदी.

युवराज बाबासाहेब काळे यांचे बी ई मॅकेनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण सोलापूर येथे झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी तो पुण्याला आला होता. त्यातच त्याला मिसळ कट्टाची कल्पना सुचली. सुरूवातीला एक कामगार सोबत घेवून तो मिसळ कट्टा चालवायचा. रात्री तिथेचं झोपायचा. परत सकाळी लवकर उठून मिसळची तयारी करायचा. वर्षभर हाच दिनक्रम सुरू होता.

मिसळ कट्टाच्या प्रवासाबद्दल सांगताना युवराज पुढे म्हणाला, “ लोकांना मिसळ आवडू लागली होती. त्यामुळे मीही उत्साहात होतो. त्याच काळात मला अनेक लोकांचे फ्रॅन्चाईजीसाठी फोन यायचे. मला सुरुवातीला ही फ्रॅंचाईजी भानगड काय आहे, हे माहित नव्हतं. त्याचा मी अभ्यास केला. त्यातूनच मला लक्षात आलं की हा एक चांगला व्यवसाय होवू शकतो. पण अडचण होती. सगळ्या ठिकाणी मी मिसळचा एकसारखी मिसळ कशी बनवणार ? चवीत बदल झाला तर ग्राहकांची फसवणूक होईल. म्हणून मी मिसळच्या मसाल्याच्या सेल्फ लाईफवर काम केलं. त्यानंतर मिसळ कट्टाचा विस्तार सुरू केला.”

आगामी काळात मिसळ कट्टा च्या सगळ्या शाखांवर ती मिसळचा रेडी टू इट मसाला,भेळ, पाणी पुरी, चिवडा, चटणी, भंडग, त्याचबरोबर विविध तयार मसाले ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याच युवराजने सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: