Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

विठ्ठलाला एवढी प्रार्थना मला भुका राहू देऊ नको,माझ्या घरून भुका कोणाला जाऊ देऊ नको,कीर्तनाच्या कार्यक्रमात आमदार चव्हाण भावूक…

0
0 0
Read Time2 Minute, 33 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

संपादक गफ्फार मलिक(शेख)

चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरातील शिवनेरी फाउंडेशन आयोजित एकदंत गणेश सांस्कृतिक महोत्सवात दि 2 सप्टेंबर रोजी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता यावेळी बोलतांना तालुकवासीयांसमोर आमदार मंगेश चव्हाण तालुकवासीयांचे प्रेम पाहून आपले अश्रू थांबवू शकले नाही.
रामायणचार्य ह.भ.प रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम रात्री ८ वाजता आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना तालुकवासीयांसमोर मंचावर उभे राहून बोलत होते तालुकवासीयांच्या सुखासाठी विठ्ठलाला प्रार्थना केली की मला भुका राहू देऊ नको,माझ्या घरून कोणाला भुका जाऊ देऊ नको, मला तालुक्यातील जनतेने अपेक्षेपेक्षा जास्त दिले असून एका ग्रामपंचायत मध्ये पाणी सोडणाऱ्याच्या मुलाला तालुक्याचा आमदार करून जो विश्वास दाखविला आहे त्याचा कायम ऋणी असणार आणि आपल्या कार्यातून तालुक्यातील जनतेने दिलेल्या प्रेमाचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे सांगून आमदार चव्हाण यांचा आवाज भरून आला व त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध सुटला तालुक्यातील जनतेचा विचार करताना भावनिक झालेले आमदार चव्हाण म्हणजे तालुक्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून वारंवार आपल्या तालुक्यातील जनतेसाठी आपल्या कर्तृत्वाची चमक दाखवत असतात आज त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू म्हणजे तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केलेले असल्याची ग्वाही आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: