अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
अधिकार आमचा विशेष
चाळीसगाव शहरातील सुप्रसिद्ध विधीतज्ज्ञ,अभ्यासू नेतृत्व आणि राजकारणाचा वडील माजी आमदार ईश्वर जाधव यांच्या कडून वारसा लाभलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे ॲड गौतम ईश्वर जाधव. जेष्ठांचा अनुभव आणि तरुणांचा उत्साह यांचा सुंदर संगम असलेले हे नाव…
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत आमदार मंगेशदादा चव्हाण व सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी ॲड. गौतम जाधव यांच्यावर विश्वास टाकत प्रभाग क्रमांक ९ मधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी दिली. अल्पावधीतच त्यांनी केवळ निवडणूकच लढवली नाही, तर आपल्या उच्च शिक्षण, सुसंस्कृत विचारसरणी, कायद्याचे सखोल ज्ञान आणि नम्र स्वभावाच्या जोरावर प्रभागात व पक्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
निवडणुकीच्या रणांगणात अपार कष्ट, प्रामाणिक प्रयत्न आणि जनतेशी थेट संवाद साधत त्यांनी प्रचार केला. मात्र राजकारणात जय–पराजय हा प्रवासाचा एक भाग असतो, आणि पराभव आला तरी मोठ्या मनाने तो स्वीकारण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. पक्षाशी, नेतृत्वाशी आणि मंगेशदादा व प्रतिभाताई यांच्याशी असलेली निष्ठा त्यांनी कधीही ढळू दिली नाही.
याच सर्वव्यापक, संयमी आणि प्रामाणिक स्वभावामुळे आज प्रभागातील नागरिक, पक्षातील कार्यकर्ते तसेच सुशिक्षित व जाणकार वर्गामध्ये एकच भावना उमटत आहे —
“अशा निष्ठावंत, अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाला पक्षाने योग्य संधी द्यायलाच हवी.”
जनसामान्यांचे ठाम मत आहे की भारतीय जनता पक्षाने तसेच आमदार मंगेशदादा चव्हाण व सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी ॲड. गौतम ईश्वर जाधव यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर संधी द्यावी.
कारण राजकारणात पदापेक्षा निष्ठा, विचारांची शुद्धता आणि समाजसेवेची तळमळ अधिक महत्त्वाची असते, आणि ती गुणवैशिष्ट्ये ॲड. गौतम जाधव यांच्यात पुरेपूर दिसून येतात.
आज पराभवातही ज्यांनी आपली उंची कमी होऊ दिली नाही, उद्या संधी मिळाल्यास ते चाळीसगावच्या विकासासाठी अधिक भक्कम योगदान देतील, असा विश्वास जनतेच्या मनात दृढपणे रुजलेला आहे.
