{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी): मुक्ताईनगर जवळील हरताळा फाटा परिसरात मुंबई-नागपूर महामार्गावर गुरुवारी (दि.१२) भीषण अपघात घडला. राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार मजुरांना जोरदार धडक दिली. या अपघातात चारही मजूर गंभीर जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गालगत काही मजूर कामासाठी उभे असताना अचानक समोरून चुकीच्या दिशेने वेगाने आलेल्या कारचे चालकावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट मजुरांवर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की मजूर काही अंतरावर फेकले गेले. अपघातानंतर परिसरात एकच आक्रश पसरला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त कारची तपासणी केली असता काही संशयास्पद बाबी समोर आल्या. कारच्या पुढे आणि मागे वेगवेगळ्या क्रमांकाच्या नंबर प्लेट्स लावण्यात आल्या होत्या. तसेच गाडीत लाठ्या आढळून आल्याने ही कार नेमकी कोणाची,या गाडीचा गैरवापर केला जात होता का? याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
अपघातानंतर चालक कार सोडून घटनास्थळावरून पसार झाला. पोलिसांनी पंचनामा करून फरार चालकाच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून परिसरात नाकाबंदीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे महामार्गावर राँग साईडने वाहन चालविणे आणि अवैध वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
