{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा पोलिसांच्या दक्षतेमुळे दोन अल्पवयीन मुलींचा वेळेत शोध लागून त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यात यश आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राहुल भिमराव सोनवणे यांना जळगाव पोलीस अधीक्षकांकडून प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी भडगाव पोलीस स्टेशनकडून माहिती प्राप्त झाली होती की, प्रेमप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दोन अल्पवयीन मुली घरातून पळून गेल्या आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून पोहेकॉ. राहुल सोनवणे यांनी तात्काळ कारवाई करत चाळीसगाव शहर परिसरात शोधमोहीम राबवली.
अत्यंत तत्परतेने आणि कौशल्याने तपास करत त्यांनी दोन्ही मुलींचा शोध घेत त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित मुलींना भडगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी त्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या सेवेमुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिष्ठा अधिक उंचावल्याचे नमूद केले. तसेच, भविष्यातही अशाच प्रकारे कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत न्यायव्यवस्थेच्या उज्ज्वल परंपरेत भर घालाल, असा विश्वास व्यक्त करत त्यांना प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले.
चाळीसगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
