अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहर पोलीसांनी मोठी कारवाई करत अवैधरित्या वाहतूक होणारा गुटखा साठा जप्त केला असून सुमारे ३७ लाख ७५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी वाहन चालकाला अटक करण्यात आली असून इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.
दिनांक १८ मार्च २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक संदिप घुले व त्यांच्या पथकातील कर्मचारी शहरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आयशर वाहन (क्र. MH-04 LQ-2543) मधून अवैध गुटखा माल नांदगावकडून जळगावकडे नेला जात आहे. सदर माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर गावाजवळ चाळीसगाव-भडगाव रोडवर सापळा रचण्यात आला.
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोलिस उपनिरिक्षक संदीप घुले यांच्या सतर्कतेने संशयित वाहन येताना दिसताच पोलिसांनी ते थांबवून चालकाची चौकशी केली. चालकाने आपले नाव शहजाद अहमद मोहम्मद याकुब (वय २८, रा. नवसारी, गुजरात) असे सांगितले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला व सुगंधीत तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष जप्ती पंचनामा केला. यामध्ये विमल पान मसाला व सुगंधीत तंबाखूचे एकूण ३७लाख ७५ हजार २०० रुपयांचे पाकिटे जप्त करण्यात आली.तसेच वाहतूक करणारे वाहन जप्त करत या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात BNS 2023 चे कलम 123, 223, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौकशीत सदर वाहन हे धुळे येथील बाळू शिंगाडे यांचे असल्याचे समोर आले असून इतर संबंधित आरोपींचा शोध सुरू आहे. अटक आरोपीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात येणार असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक संदिप घुले व पथकाने केली.
एकूण मिळून आलेला साठा…
विमल पान मसाला एकुण साठा 6,600 पाकीटे, किमंत प्रती पाकीट रु-198/-रु. एकुण- 13,06,800/-रु., विमल पान मसाला 11,000 पाकिटे किमंत प्रती पाकीट रु176/- रु.एकुण-19,36,000/-रु., व्ही 01 सुगंधित तंबाखु एकुण पाकिटे 6600 किमंत प्रती पाकीट 44/रु एकुण 2,90,400/-रु
व्ही 01 सुगंधीत तंबाखु एकुण पाकिटे 11000 किंमत प्रती पाकीट 22/रु एकुण 2,42,000/-रु असा एकुण :- 37,75,200/-रु. रुपये किमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतीबंधीत केलेला गुटख्याचा साठा मिळून आलेला आहे.
