संपादक गफार शेख (मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-नगरपालिकेकडून प्लास्टिक विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी (22 जानेवारी 2025) रोजी एकाच दिवसात 6 ठिकाणी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.
प्लास्टिक विरोधी मोहिमेत सुरुवात करत सुमारे 10 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. इतकेच नाही तर दंड सुद्धा वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिक विरोधी मोहिमेत कारवाई करुन 21 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.त्यात अंबिका स्वीट,भारती प्रोव्हीजन,सोनल सुपारी यांच्याकडून प्रत्येकी 5 हजारांचा दंड तसेच इतर किरकोळ व्यवसायिकांकडून मिळून 6 हजार असा एकूण 21 हजारांचा दंड नपा तर्फे वसूल करण्यात आला आहे.
प्लास्टिक विरोधी ही मोहीम यापुढे देखील तीव्र गतीने सुरु राहणार असल्याचं चाळीसगाव नपाने सांगितले आहे.
चाळीसगाव नगरपालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रात प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. यापुढच्या काळात देखील ती वेगाने सुरु राहणार आहे. कारवाई करण्यासाठी पथक गठीत करण्यात आले आहे.
एकल वापर प्लास्टिक बंदी मोहिमेत कारवाई करत दंड वसूल करणाऱ्या पथकात पथक प्रमुख दिनेश जाधव,स्वच्छता निरीक्षक. अनिल गाढे,संजय गोयर,विजय जाधव,राहुल निकम, शहर समन्वयक करण चव्हाण, मुकादम प्रशांत जाधव, सुमित सुमित सोनवणे तसेच कर्मचारी यांचा समावेश आहे.
