संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि.1 जुलै 2024 रोजी चाळीसगांव नगरपालिका उपमुख्यअधिकारी यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य पुर्णाकृती स्मारक चाळीसगांव हॉटेल दयानंद कॉर्नर चौकात झाले पाहिजे यासाठी निवेदन देण्यात आले.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, कष्टकऱ्यांच्या हातावर उभी आहे,असे संपूर्ण जगाला ठणकावून सांगणारे,कंपनी कामगार असो की रस्त्यावरचा श्रमिक, बांधकाम मजूर, शेतमजूर या सर्वांसाठी अण्णा भाऊ साठे प्रेरणास्थान असून,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य दिव्य पुर्णाकृती स्मारक चाळीसगांव हॉटेल दयानंद कॉर्नर चौकात शहरात झाले पाहिजे यासाठी नगरपालिका उपमुख्यअधिकारी यांना आणाभाऊ साठे स्मारक समितीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी नितीन मरसाळे, अण्णा कांबळे, गजानन चंदनशिव, सुभाष पगारे, अजय पाखरे, निलेश शिरसाठ, निलेश खरात, रमेश खरात हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
