संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- इंडियन मेडीकल असोसियेशन च्या वतीने स्त्री आणि पुरुष दोघांसाठी डॉक्टर्स डे निमित्त विनामूल्य हाडांची घनता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात आपल्या हाडांच्या घनतेची विनामूल्य तपासणी तर होणार असून हाडांच्या कमकुवतपणा आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांपासून बचाव कसा करावा,निरोगी आणि मजबूत हाडांसाठी आहार आणि व्यायामाचे मार्गदर्शन देखील शिबिरात केले जाणार आहे.
डॉक्टर्स डे निमित्ताने हे शिबिर आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रुग्णांनी या तपासणी शिबिराची लाभ घेण्याचे आवाहन इंडियन मेडीकल असोसियेशन चे प्रेसिडेंट डॉ संजय चव्हाण व सेक्रेटरी डॉ किरणकुमार मगर यांनी केले आहे
दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत स्त्री चैतन्य हॉस्पिटल, हिरापूर रोड, चाळीसगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी 7028394493 या क्रमंकावर संपर्क साधावा.
