अधिकार आमचा न्यूज नेटवर्क संपादक गफ्फार शेख (मलिक) उपसंपादक रोहित शिंदे भाजपाच्या संसदरत्नांचा अभिमान! जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या अभ्यासू खासदार मा.श्रीमती स्मिताताई वाघ यांनी पहिल्याच खासदारकीच्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य करत ‘संसदरत्न’ पुरस्कार पटकावला आहे. पक्षाची भूमिका त्यांनी संसदेत अभ्यासपूर्ण मांडली.सर्व चाळीसगाव मतदारसंघाच्या वतीने स्मिताताई यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! – आमदार मंगेश चव्हाण चाळीसगाव(प्रतिनिधी)- जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना संसदेतील उत्कृष्ट कार्यासाठी ‘संसदरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दोन्ही सभागृहातील सतरा खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.यात सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश आहे. प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने यंदा सतरा नावांची घोषणा केली आहे. यात भर्तृहरी माहताब, सुप्रीया सुळे, श्रीरंग बारणे आणि एनके प्रेमचंद्रन या चार खासदारांना सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित 13 नावांमध्ये जळगावच्या खासदार स्मिताताई उदय वाघ यांच्या नावाचा समावेश आहे. लोकशाही मूल्यांना मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. खासदार स्मिताताई वाघ यांनी आपल्या लोकसभेतील पहिल्याच टर्ममध्ये आपल्या कामाची अमीट छाप अंकीत केली असून याचमुळे त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात येत आहे. About The Author admin पत्रकारिता क्षेत्रात गत १३ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा ७ वर्षांचा अनुभव.राजकारण,नगरपालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. लोकसभा, विधानसभा, नपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 8999957772 See author's posts Views: 255 Post navigation माध्यमिक विद्यालय देवळी शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळ्याव्यातून जपली सामाजिक बांधिलकी…… स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारीपदी पोलिस निरीक्षक संदीप पाटील…