oplus_2097154
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- आज दिनांक २७ जून जी.जे. 26 टी 5314 क्रमांकाची श्री हरी ट्रॅव्हल्सची खासगी प्रवासी बस चाळीसगाव मार्गे सुरतकडे प्रवासी घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला उलटून अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी, तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये सुमारे 21 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर जखमींना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात शितल परमेश्वर गुंदवणे (वय 40) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे कळते तसेच शिवाजी शंकर महाले (वय 74) यांनाही डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याशिवाय एका लहान मुलीसह आणखी एक जण किरकोळ जखमी झाला असल्याचे ग्रामीण रुग्णालयात मिळालेल्या माहितीवरून कळते.
ग्रामीण रुग्णालयात एकूण चार जखमींवर उपचार करण्यात आले. त्यापैकी शितल गुंदवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, त्यांचे नातेवाईक त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातातील जखमींवर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. मंथन जाधव व त्यांचं यांनी प्राथमिक उपचार केले. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चाळीसगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
