अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- नुकतेच ग्रामीण पोलिस ठाण्याचा प्रभार स्वीकारल्यानंतर आपल्या कार्याची सुरुवात सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी यांनी केली असून तालुक्यातील सांगवी गावात गावठी दारू निर्मितीविरोधात ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करत सुमारे ६५ हजार रुपयांचा रसायन व साहित्याचा मुद्देमाल नष्ट केला.
सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत, एएसआय युवराज नाईक, हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील व नरेंद्र बाविस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या कारवाईदरम्यान करण अशोक राठोड, जगन्नाथ पोमां राठोड, विनोद मांगीलाल चव्हाण, साहेबराव रामा राठोड आणि ज्ञानेश्वर मदन राठोड यांच्या ताब्यातून गावठी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन व इतर साहित्य जप्त करून घटनास्थळी नष्ट करण्यात आले. या कारवाईत एकूण सुमारे ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
ग्रामीण पोलिसांकडून अवैध गावठी दारू निर्मिती व विक्रीविरोधात सातत्याने कारवाया सुरू असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाईचा करण्याचा इशारा ग्रामीण पोलिसांनी यावेळी दिला आहे.
