अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख
चाळीसगाव (प्रतिनिधी) —डॉ. होमीभाभा फाउंडेशनच्या प्रतिष्ठेच्या परीक्षेत गुड शेफर्ड अकॅडमीची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. ॲनी डॅनियल दाखले हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ॲनीने संपूर्ण महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक पटकावत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली असून, या नेत्रदीपक यशासोबतच तिची ISRO टूरसाठी निवड झाली आहे.ॲनी ही गुड शेफर्ड अकॅडमीचे प्राचार्य श्री. डॅनियल दाखले यांची कन्या आहे.
लहानपणापासूनच अभ्यासाची गोडी असलेल्या ॲनीने वडिलांकडून मिळालेल्या प्रेरणेच्या बळावर सातत्यपूर्ण मेहनत घेत हे अलौकिक यश मिळवले आहे. तिचे हे यश केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण शाळेसाठी अभिमानास्पद ठरले आहे.
ॲनीच्या यशामध्ये प्राचार्य डॅनियल दाखले सर यांचे मार्गदर्शन तसेच शिक्षक श्री. शैलेंद्र मराठे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ॲनीच्या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.ISRO टूरसाठी झालेली निवड ही ॲनीच्या शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वाची पायरी असून, भविष्यात ती निश्चितच नवे शिखर गाठेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
