अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक छापा टाकत मोठी कारवाई केली. पोलीस निरीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जळगाव माहेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर पवार व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
धुळे–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल प्रांजलच्या बाजूला असलेल्या खोलीत रात्री ९.३० वाजता छापा टाकण्यात आला. या ठिकाणी सोशल क्लबच्या नावाखाली जुगार खेळला जात असल्याचे उघड झाले.
या कारवाईत जुगार खेळत असलेले १) प्रविण विलास गोत्रे रा. गोत्रेमळा धुळे रोड, चाळीसगांव २) संजय रतन गायकवाड वय ३७ वर्षे रा. वडगांव लांबे ता.चाळीसगांव (मॅनेजर) ३) भुराजी गौराजी दहीहंडे वय ५६ वर्षे रा. साईबाबानगर, नकाणे रोड, धुळे ४) रशीद कादर पठाण वय ५६ वर्षे रा. गांधीनगर, नळवाडी नाका, बीड जि. बीड ५) शाबिरखान फयाजखान वय ३५ वर्षे रा. भोईवाडा, प्रभात गल्ली चाळीसगांव ६) कैलास नामदेव भाबड वय ५२ वर्षे रा.बाबड वस्ती आनंदवाडी, मनमाड जि. जळगांव ७) विठठल खंडेराव वाघ वय ७२ वर्षे रा. अभियंता कॉलणी, चाळीसगांव ८) गोपालदास नारायणदास रत्नानी वय ५९ वर्षे रा.यश अपार्टमेंट दावणी मोहल्ला, छत्रपती संभाजीनगर ९) कलीमशहा सलीम शेख वय ४७ वर्षे रा. चामुंडामाता मंदीर जवळ, चाळीसगांव १०) अशपाक परमजीत पंजावी वय ३८ वर्षे रा. डेराबर्डी, धुळे रोड, चाळीसगांव ११) अकलाद शेख इस्लमाईल शेख वय ३१ वर्षे रा. हुडको कॉलणी, त्रिमुती बेकरी जवळ, चाळीसगांव १२) प्रविण संतोष पाटील वय ३१ वर्षे रा. अयोध्यानगर, धुळे रोड, चाळीसगांव १३) सागर राजेंदू चौधरी वय २७ वर्षे रा.५१९ विठ्ठलपेठ, जुना नशिराबाद रोड, जळगांव १४) अमोल गणपत गवळी वय २९ वर्षे रा. गायकेनगर, हिरापुर रोड, चाळीसगांव १५) फिरोज चॉदखा पठाण वय ४२ वर्षे रा.हुडको कॉलणी, चाळीसगांव जि. जळगांव १६) सुरेश निंबा मानकर वय ४५ वर्षे रा. ताहराबाद ता. सटाणा जि. नाशिक या १६ जणांना ताब्यात घेण्यात आले होते, त्यांच्याकडून २,८२,९७० रुपये रोख, पैशांच्या स्वरूपातील कॉईन तसेच मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सपोनि शंकर मुटेकर, पोउनि संदीप घुले, पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ भुपेश वंजारी, पोहेकॉ समीर पाटील, पोकॉ दत्तात्रय पाटील, पोकॉ विलास पवार, पोकॉ गोपाल पाटील, पोकॉ विजय महाजन, पोकॉ अशोक मोरे यांच्या पथकाने सहभाग घेतला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विलास पवार यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले करीत आहेत.
