अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- अवैधरित्या जळाऊ लाकूड वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकांवर वनविभागाने कारवाई करत ते जप्त केले. ही कारवाई चाळीसगाव–मालेगाव रस्त्यावर गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक १० मार्च २०२६ रोजी चाळीसगाव येथील वनपरीक्षेत्र अधिकारी सौ. कोमल पिंडकुरवार यांना गुप्त माहिती मिळाली की चाळीसगाव हद्दीतून अवैध लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक मालेगावच्या दिशेने जाणार आहेत. त्यानुसार त्यांनी तात्काळ पथक नेमून संबंधित वाहनांना पकडण्याच्या सूचना दिल्या.
वनविभागाच्या पथकाने सापळा रचून रात्री सुमारे १.३० वाजेच्या सुमारास MH 19 G 0100 क्रमांकाचा ट्रक पकडला. या ट्रकमध्ये निम, भोकर व लोखंडी प्रजातीचे जळाऊ लाकूड भरलेले आढळले. चालकाकडे वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्याने ट्रक जप्त करून वनपरीक्षेत्र कार्यालय, चाळीसगाव येथे आणण्यात आला.
त्यानंतर सकाळी सुमारे ४.३० वाजेच्या सुमारास MH 20 DE 9252 क्रमांकाचा दुसरा ट्रकही पकडण्यात आला. या दोन्ही वाहनांवर भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक जळगाव राम धोत्रे, वनसंरक्षक अमोल पंडित व वनपरीक्षेत्र अधिकारी सौ. कोमल पिंडकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात वनपाल सी. व्ही. पाटील, सागर पाटील तसेच वनरक्षक ललित पाटील, अजय महिरे, काळू पवार, उमेश सोनवणे, रखवालदार संजय गायकवाड, भटू अहिरे व राहुल मांडोळे यांचा समावेश होता.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल सागर पाटील (घोडेगाव) करीत आहेत.
