Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव(प्रतिनिधी)-: जिल्ह्यातील गॅस एजन्सी धारकांसाठी जिल्हा पुरवठा विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा आता केवळ घरपोच पद्धतीने करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांनी या संदर्भातील आदेश जारी केले असून, गॅस एजन्सी किंवा गोडाऊनमधून ग्राहकांना थेट सिलिंडर देण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
इंधन पुरवठ्यातील अनिश्चितता आणि गोडाऊन किंवा कार्यालयाबाहेर वाढणारी ग्राहकांची गर्दी यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या स्थानिक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता गॅस सिलिंडरसाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही आणि बुकिंग केल्यानंतर घरपोच सिलेंडर ग्राहकांना प्राप्त होणार आहे.
