Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव नगरपालिकेच्या राजकीय इतिहासात देशमुख घराण्याचे नाव केवळ एक आडनाव नाही, तर शहराच्या विकासाशी जोडलेली एक जिवंत परंपरा आहे. अनेक दशकांपासून या घराण्याने नगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले असून, आज त्या परंपरेला नवा श्वास मिळताना दिसत आहे.
अभिषेक देशमुख यांच्या रूपाने देशमुख घराण्यातील चौथी पिढी आता सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहे.
या परंपरेची सुरुवात माजी नगराध्यक्ष रामराव देशमुख यांनी केली. त्यानंतर माजी नगराध्यक्ष अनिल देशमुख यांनी सर्वाधिक काळ नगराध्यक्षपद भूषवित चाळीसगावच्या विकासाला दिशा दिली. रस्ते, पायाभूत सुविधा, नागरी सोयीसुविधा आणि प्रशासनातील शिस्त या त्यांच्या कार्यकाळातील ठळक ओळखी ठरल्या. त्यांच्या निधनानंतर राजीव देशमुख यांनी नगरपालिकेची धुरा समर्थपणे सांभाळत शहराच्या प्रगतीचा प्रवास थांबू दिला नाही. मात्र, त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण शहर हळहळले.
आज त्या आठवणींच्या सावलीतूनच नवी आशा उगवताना दिसत आहे. राजीव देशमुख यांच्या पश्चात आता नगरसेवक अभिषेक देशमुख यांच्या माध्यमातून देशमुख घराण्याची चौथी पिढी नगरपालिकेत प्रवेश करत आहे. त्यामुळे चाळीसगावच्या राजकीय वर्तुळात नव्या नेतृत्वाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. आगामी काळात शहर विकास आघाडीचे नेतृत्व अभिषेक देशमुख करणार असल्याचे बोलले जात असून, त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
तरुण, अभ्यासू आणि आधुनिक दृष्टिकोन असलेले नेतृत्व म्हणून अभिषेक देशमुख यांच्याकडे पाहिले जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा, नवी ऊर्जा निर्माण करून शहरवासीयांच्या त्यांच्या कडून असलेल्या अपेक्षा अभिषेक देशमुख करतील,असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
देशमुख घराण्याने आजवर चाळीसगावसाठी दिलेल्या सेवांचा वारसा जपत, त्या परंपरेला नव्या काळाची जोड देण्यासाठी अभिषेक देशमुख नगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. परंपरेचा अभिमान आणि भविष्याची उमेद — या दोहोंचा संगम म्हणजेच आजचा हा नवा अध्याय, असेच चाळीसगावकरांना वाटत आहे.
