अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि १४ जानेवारी रोजी वनविभागास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टेकवाडे शिवारात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले. या माहितीनंतर वनविभागाने न्हावे–टेकवाडे रस्त्यावर सापळा रचून अवैधरीत्या निम प्रजातीचे जळाऊ लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचा अटकाव केला.
तपासणीदरम्यान ट्रॉलीमध्ये निम प्रजातीचे जळाऊ लाकूड भरलेले आढळून आले. संबंधित ट्रॅक्टर चालकाकडे वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना सादर करता आला नाही. त्यामुळे ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ट्रॅक्टर क्रमांक MH 19 C 9629 हे वनपरिक्षेत्र कार्यालय, चाळीसगाव (प्रा) येथे आणण्यात आले.
या प्रकरणी POR नं. 01/2026, दिनांक 14/01/2026 अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. वनपरिक्षेत्र अधिकारी चाळीसगाव श्रीमती कोमल पिंडकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सी. व्ही. पाटील, वनरक्षक गणेश काळे, ललित पाटील, वाहनचालक राहुल पवार व रखवालदार धनंजय पाटील यांच्या पथकाने केली. पुढील तपास वनपाल सी. व्ही. पाटील हे करीत आहेत.
