{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील पोहरे शिवारातील पोहरे–कळमडू रस्त्यावरील महादेव मंदिराजवळ सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामातून अज्ञात चोरट्याने 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी पंकज नामदेव गवळे (वय 34, रा. प्रबुद्ध नगर, जुने विमानतळ, चाळीसगाव) हे रोड कॉन्ट्रॅक्टर असून पोहरे ते कळमडू रस्त्यावरील काँक्रिटीकरणाचे काम करीत आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, 31 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता काम पूर्ण करून ते व मजूर घरी परतले. त्यावेळी कामासाठी वापरण्यात येणारे गुरु कंपनीचे कटर मशीन व जनरेटरचा डायमा कामाच्या ठिकाणीच ठेवण्यात आला होता.दुसऱ्या दिवशी, 1 सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे 10 वाजता कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर कटर मशीन व जनरेटरचा डायमा जागेवर आढळून आला नाही. परिसरात शोध घेऊनही साहित्य मिळून न आल्याने अज्ञात चोरट्याने ते चोरी करून नेल्याचे निष्पन्न झाले.
चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये सुमारे 50 हजार रुपये किमतीचे गुरु कटर मशीन आणि 20 हजार रुपये किमतीचा जनरेटरचा डायमा असून एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मेहुणबारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.