अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक
चाळीसगाव प्रतिनिधी – तालुक्यातील वाघळी येथील ग्रामपंचायत सदस्याचे कुटुंबीयांचे घर अतिक्रमण क्षेत्रात असल्याने जिल्हाधिकारी व नाशिक आयुक्त यांनी ग्रामपंचायत सदस्य ललित पवार यांना अपात्र घोषित केले आहे.
तालुक्यातील वाघळी गावातील ग्रामपंचायत सदस्य ललित पवार यांच्या कुटुंबीयांचे घर अतिक्रमण क्षेत्रात असल्याने वाघळी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सूर्यवंशी यांनी याबाबत जिल्हाअधीकारी जळगाव यांच्या न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारीची चौकशी होऊन ग्रामपंचायत सदस्य ललित पवार यांना अपात्र घोषित केले होते
त्यावर ललीत पवार यांनी नाशिक आयुक्तालयात अपिल दाखल केले होते.तेथेही सदर सुनावणी दरम्यान चौकशी होऊन नाशिक आयुक्तालयाच्या वतीने प्रकाश सूर्यवंशी यांनी अतिक्रमण असलेबाबत कागदपत्रे सादर केले असता न्यायालयाने ललित पवार यांना अपात्र ठरविण्यात बाबत निकाल दिला आहे.
