Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या पोलीस निरीक्षक बकाळें वर गुन्हा दाखल करावा – चाळीसगाव सकल मराठा समाजाचे अपर पोलीस अधीक्षक कार्यालया समोर तीव्र आंदोलन……

0
0 0
Read Time5 Minute, 6 Second

.

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

तब्बल दोन तास दोषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन……

चाळीसगाव(प्रतिनिधी) – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाळे यांनी मराठा समाजाबबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे अश्या जातीयवादी अधिकाऱ्याला कायमस्वरूपी सेवेतुन बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कार्यालया समोर दि १५ रोजी ११ ते १ वाजेपर्यंत तब्बल २ तास सकल मराठा समाजाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी लवकरच किरण बकाळेंवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
महाराष्ट्रातील मराठा समाज हा अठरा पगड जाती जमातींना घेऊन चालणारा समाज आहे. मराठा समाजातील नेतृत्वाने सर्वच समाजाचा उद्धार करण्याचे धोरण अंगीकारले आहे. मराठा समाजाच्या विकासासोबत इतर समाजाचा विकास होऊन महाराष्ट्राच्या व पर्यायाने राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लागेल अशीच भूमिका मराठा समाजाने कायम घेतलेली आहे. मात्र जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाळें ह्या जातीयवादी अधिकाऱ्यानं मराठा समाजाच्या आया बहिणींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून मराठा समाजाची बदनामी केलेली आहे. मराठा समाजाबद्दल अत्यंत घाणेरडे वक्तव्य करून मराठा समाजाचा अपमान केलेला आहे. राष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या मराठा समाजावर उच्च पदावरील अधिकारी आपली पातळी सोडून बोलत असेल तर मराठा समाज गप्प बसणार नाही
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाळें यांची फक्त बदली न करता पुढील ३ दिवसात त्यांना तत्काळ कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करून गुन्हा दाखल करावा. जर त्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ केले नाही तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय व जळगाव पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात येइल याप्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास किरण कुमार बकाळे व पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.निवेदनाच्या प्रत
मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री म. रा मुंबई,
खासदार जळगाव,
आमदार चाळीसगाव,पोलीस महानिरीक्षक,
नाशिक विभाग,
प्रांताधिकारी भाग चाळीसगाव,तहसीलदार चाळीसगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत,आंदोलनात विर भगतसिंग विद्यार्थी परीषदेच्या जयश्री रणदिवे, विजया प्रकाश पवार,अलका मगर, मायाबाई पाटील,सविता पाटील,सुनीता पाटील,पंकज रणदिवे, रयत सेनेचे सुमित भोसले,संता पैलवान,संजय कापसे,आबासाहेब गरुड,ॲड राहुल जाधव,गोकुळ पाटील,विनायक मांडोळे ,छोटु अहिरे ,स्वप्नील गायकवाड,मुकुंद पवार, मराठा सेवा संघाचे प्रशांत गायकवाड,खुशाल पाटील,पप्पू पाटील,प्रदीप देशमुख,सुनील चव्हाण,आर बी जगताप,नाना पाटील,नकुल पाटील,योगेश पाटील, मराठा महासंघाचे खुशाल बिडे, प्रतिभा पवार, सोनाली बोराडे, सुरेश पाटील, नामदेव तुपे ,सागर बोरसे, सुदर्शन देशमुख यांच्यासह सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: