अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय दिवस’ तसेच ‘राजर्षी शाहू महाराज जयंती’ निमित्त जनजागृती शिबीर संपन्न..

संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)-माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.२६ जून २०२३ रोजी ‘अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय दिवस’ तसेच ‘राजर्षी शाहू महाराज जयंती’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव, जि. जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले.
सर्व प्रथम राजर्षी शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. सदर शिबीरात श्री.दिलीप बारकु परदेशी, सहा. शिक्षक अनु. जाती नवबाैध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. श्री. रमेश सुधाकर पोतदार, समांतर विधी सहाय्यक तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी राजर्षी शाहु महाराज यांचेवर कविता सादर केली. तसेच विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून होणार दुष्परिणाम बाबत काव्यस्वरुपात मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव श्री.एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘अंमली पदार्थाचा गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरुध्द आंतरराष्ट्रीय दिवस’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सदर शिबीरात शिक्षक वृंद श्री.धृवास राठोड, श्री.महेंद्र कुमावत, श्री. ज्ञानेश्वर लिंगायत तसेच पी.एल.व्ही. श्री. देवेश दिपक पवार, तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन श्री.डी.के.पवार,वरिष्ठ लिपीक व श्री. तुषार अनिल भावसार, शिपाई यांनी पाहिले. श्री.डी.व्ही.साळवे, मुख्याध्यापक, अनु. जाती नवबाैध्द मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.