दौंड पोलिसांची ऑनलाईन मटका जुगारावर धडक कारवाई .

Read Time4 Minute, 54 Second

अधिकार आमचा न्युज पोर्टल

दौंड प्रतिनिधी पवन साळवे

दौंड:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.पण तरीही दौंडमध्ये काही ठिकाणी अवैद्यरीत्या व्यवसाय चालू असल्याने दौंडचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी धडक कारवाई करत आहे असाच एक प्रकार दौंड शहरात घडला आहे दिनांक-११/५/२०२० रोजी उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना ऑनलाईन मटका चालू असल्याची माहिती मिळताच समतानगर येथील पत्र्याच्या शेडमध्ये संजय बारवकर नावाचा इसम ऑनलाईन मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस कार्यालय येथील पोलीस उपनिरीक्षक श्री नितिन मोहिते व पो.हवा.नंदकुमार केकान यांना बातमीची खात्री करण्यासाठी पाठविले असता.सुमारे सायंकाळी ८ वाजता जुगार अड्ड्यावर वाहने थांबलेली दिसली असता आतमध्ये पाहणी करण्यासाठी गेले असता आतमध्ये ऑनलाईन मटका खेळताना काही इसम दिसले पोलिसांना पाहताच तेथील सर्व इसम पळून गेले.पो.उपनिरीक्षक मोहिते यांनी दौंड पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली व पंच व पोलीस कर्मचारी पाठविण्यास सांगितले. त्याच ठिकाणी मनोज बारवकर,संजय भिमराव बारवकर, हे शेडजवळ आले तेव्हा राजू बारवकर संजय बारवकर हे पोलीस उपनिरीक्षक मोहिते व त्यांच्या सोबत असलेले पो.हवा. केकान यांना तुम्ही आमच्या धंद्यांवर का कारवाई करता व तुम्ही यापूर्वीही आमच्या धंद्यांवर कारवाई केली आहे. असे सांगून दमदाटी करून अंगावर धावून गेले व तू शर्मा मॅडमच्या जीवावर तू कारवाई करतो तुला काय करायचे आहे ते कर तुला नंतर बघून घेतो असे म्हणून राजू बारवकर याने पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांच्या खांद्याला हाताने धक्का मारल्या प्रकरणी व सरकारी कामात अडथळा आनल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या न्यायालया समोर हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आले आहे अशी माहिती पो उपनिरीक्षक अमृता काटे यांनी दिली.ऐश्वर्या शर्मा मॅडमच्या जीवावर कारवाई करतो तुला बघून घेतो असे बोलून राजू बारवकर,संजय बारवकर.हे तेथून मोटारसायकल वर निघून गेले तर मनोज बारवकर हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला काही वेळाने दौंड पोलीस स्टेशनचे कर्मचारी तेथे पंचासह हजर झाले त्यावेळी तेथील पत्र्याच्या शेडमध्ये असलेले ऑनलाईन जुगाराचे साहित्य त्यामध्ये सी.पी.ओ,किबोर्ड, स्क्रीन वायफाय डोंगल व विवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम २८६० रुपये असा एकूण ५०३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर घटनेबाबत पो उपनिरीक्षक नितीन मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू भिमराव बारवकर,संजय भिमराव बारवकर,मनोज भिमराव बारवकर.यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून दौंड पोलीस स्टेशनला भारतीय दंड विधास संहिता कलम ३५३,३३२,२७०,१८८,२६९.मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम चे कलम ४,५.साथीचे रोग अधिनियम १८९७ चे कलम २,३,४. कोव्हीड-१९ उपयोजना कलम ११,राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५२(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.राजू भिमराव बारवकर,संजय भिमराव बारवकर,दोन्ही राहणार समतानगर दौंड यांना गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहे.गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे हे करीत आहे.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Previous post दौंड पोलिसांना पोलीस मित्र म्हणून महाविद्यालयीन तरुणांचे सहकार्य….
Next post दौंड शहरातील कोणती दुकाने कधी उघडनार व बंद होणार वेळ व दिवस
error: Content is protected !!
%d bloggers like this: