अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड प्रतिनिधी-पवन साळवे
संपूर्ण देशात कोरणा या विषाणूने थैमान माजले आहे आणि प्रत्येकजण आपली सामाजिक जबाबदारी समजून आपापल्या परीने जे होईल ते कार्य करीत आहेत.आणि त्या कार्याचा गवगवा संपूर्ण दौंड मधून होत आहे ते म्हणजे नगरसेविका ऍड. अरुणा डहाळे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक-९ मधील दौंड नगरपरिषदचे च्या हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ गजानन सोसायटी मधील प्रतिबंधीत क्षेत्रा मधील रहिवाश्यांना मास्क व आर्सेनिक अल्बम या होमिपॅथी औषधाचे वाटपही करण्यात आले ते पुढे असेही म्हणाले माझ्या प्रभागांमधील जनतेला कोणत्या प्रकारे काही समस्या असेल तर ते मी सोडवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल व आणि सर्व जनतेने घरात राहून कोरोनाला हरवूया असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.प्रसंगी मुख्याधिकारी श्री.मंगेश शिंदे डहाळे,गटनेते राजेश गायकवाड,आरोग्य अधिकारी शाहू पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
