अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी-सनी घावरी
18/06/2020 रोजी गुन्हे शाखा युनिट 2 कडील अधिकारी – कर्मचारी यांची पथके तयार करुन पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील आरोपींना अटक आली आहे उपनिरीक्षक एसडी निलपत्रेवार व पो.ना जयवंत राऊत यांना गोपनीय बातमी मिळाल्याने,चाकण पोलीस ठाणे / म्हाळुंगे पोलीस चौकी गुन्हा रजिस्टर नंबर 711/2020 भादवि कलम 397,394 ,34 कलम 4 (25 ) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी हे दळवीनगर परिसरात आलेअसल्याची बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक निलपत्रेवार ,पोलीस हवालदार शिवानंद स्वामी ,प्रमोद वेताळ , उषा दळे, पोलीस नाईक जयवंत राऊत ,पोलीस कॉन्स्टेबल नामदेव राऊत ,अजित सानप अशांनी दळवीनगर परिसरात सापळा लावुन थांबले असताना पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली सह शिताफीने पकडले. आरोपित यांची नावे 1) राकेश किरण उर्फ बाळासाहेब गंगावणे वय 27 धंदा- हॉटेल कामगार राहणार दळवीनगर चिंचवड 2) शुभम नंदू अवतारे वय 24 धंदा -मजुरी राहणार बारणे चाळ थेरगाव 3) सुरज नारायण कांबळे वय 21 धंदा – मजुरी रा.सदर अशी असून आरोपी राकेश गंगावणे याचे अंगझडती मध्ये सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली 2,88,000/- रुपये किंमतीची 9 तोळे वजनाची सोन्याची चैन तसेच आरोपी शुभम अवतारे याचे कब्जात 70,000 /- रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची आप्पाची मोटरसायकल व आरोपी सुरज कांबळे याचे कब्जात 50,000/- रुपये किमतीची होंडा कंपनीची ॲक्टिवा मोटरसायकल असा एकूण 4,08,000/-रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीत हे चिंचवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 364/2018 भादवि कलम 324, 504 ,506 34, आर्म अॕक्ट कलम 4 (25) व चिंचवड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 48/2020 भादवि कलम 326,504,506 राइट्सह आर्म अॕक्ट 4 (25) व निगडी पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 897/2019 भादवि कलम 394 ,504 ,506 ,34 , आर्म अॕक्ट 4 (25) मपोका कलम 37 (1) सह 135 प्रमाणे दाखल गुन्ह्यात पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले आहे. सबंधीत पोलीस ठाणेंना माहीती कळवुन आरोपीत यांची वैद्यकीय तपासणी करून म्हाळुंगे पोलीस चौकी येथे जप्त मुद्देमालासह हजर केले आहे.
अशी माहिती शैलेश गायकवाड व पो.नि.गुन्हे शाखा युनिट-2 यांनी दिला पुढील तपास एसडी निलपत्रेवार ही करीत आहेत
