चाळीसगाव – जगभरात धुमाकूळ घालणार्या कोरोनाचे संकटाने महाराष्ट्रासह अनेकविध भागात थैमान घातले आहे. चाळीसगाव तालुक्यात तुर्तास कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत. मात्र असं असतानाही लोकांमध्ये काहीसं भीतीचं निर्माण झाले आहे. कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी लोकनेते स्व. अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राना ‘नॉन कॉनटँक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरचे’ वितरीत करण्यात आले.
‘इन्फ्रारेड थर्मामीटर’ द्वारे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण, रुग्णांचे नातलग यासह नागरीकांचा येणाऱ्या नागरीकांचा ‘ताप’ मोजणे शक्य होणार असून दुरुनच संबंधित नागरिकांचे तापमान मोजणे शक्य होणार असल्याने याचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे. रुग्णालयात प्रवेश करतेवेळी रांगेत थर्मामीटरने रुग्णांसह तपासणी करण्यात येणार असून यासाठी अधिकृतपणे यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे डॉ. बी पी बाविस्कर यांनी याप्रसंगी नमुद केले.
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ बी पी बाविस्कर, डॉ मंदार करंबेळकर, पंचायत समिती सभापती अजय पाटील, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष शाम देशमुख, भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, रोशन जाधव, जगदीश चौधरी, मिलिंद शेलार, स्वप्नील कोतकर, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.