संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मुख्यमंत्री यांना चाळीसगाव सकल मराठा समाजाची मागणी

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) – मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या जीवीताला धोका संभविण्याची शक्यता असल्यामुळे शासनाने झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दि ४ नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री यांना द्वारा तहसीलदार चाळीसगाव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक नेते लढले त्यात प्रामुख्याने स्व.आण्णासाहेब पाटील,स्व.आ.विनायक मेटे यांचा घातपात झाला की खरा अपघात झाला ही बाब अजुन सुद्धा निष्पन्न झालेली नाही.राज्यातील सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील आपल्या जिवाची बाजी लावून लढत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्यामुळे त्यांची समाजाला खूप गरज असल्यामुळे त्यांच्या जिविताला धोका संभविण्याची शक्यता अथवा घातपात होवू शकतो.म्हणून महाराष्ट्र सरकारने जरांगे-पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी दि ४ रोजी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसील द्वारा करण्यात आली आहे.निवेदनावर गणेश पवार, प्रशांत गायकवाड, भरत नवले, खुशाल पाटील, छोटू अहिरे ,संजीव पाटील, राजेंद्र पाटील ,सुमित कापसे, तमाल देशमुख ,बंडू पगार, खुशाल बिडे ,दीपक चव्हाण, मिलिंद पवार ,नितीन पाटील, ,सुमित जगताप,विकास गोसावी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.