अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि.9 मे रोजी हिंदूसूर्य विरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती काॕलेज पाॕईन्ट मिञ मंडळ व रा.राजपूत करणी सेना चाळिसगाव तालुका व शहर यांचेतर्फे समाजाचे ज्येष्ठ नेते उ.मो.दादा पाटील (सचिव-सर्वोदय संस्था)यांचे हस्ते महाराणा प्रतापसिंह चौक, काॕलेज पाॕईट येथे प्रतिमापूजन करण्यात आले.त्याआधी पहलगाम येथे आतंकींनी निर्दयीपणे मारलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुलसिंह नरेंद्रसिंह राजपूत (तालुका सरचिटणीस-रा.राजपूत करणी सेना )यांनी व मिञ परिवाराने परिश्रम घेतले. तदनंतर करणसिंह ईश्वरसिंह सूर्यवंशी(जिल्हा महासचिव-रा.राजपूत करणी सेना) यांनी व मिञ परिवाराने के.आर कोतकर काॕलेज येथे आपण समाजाचे काहितरी देणे लागतो राजपूतांनी कायम देव देश व धर्म यासाठी रक्त सांडले आहे, म्हणूनच महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्ताने आपण मानवतेसाठी रक्तदान करु या या उदात्त भावनेतून परिश्रमपूर्वक 58 रक्तदात्यांना प्रोत्साहित करुन रक्तदान शिबीर घेतले.
कार्यक्रमास मंगेश पाटील,नितीन पाटील संजय रतन राजपूत भगवान राजपूत शैलेंद्रसिंह पाटील शिदवाडी,सोनूसिंह ठाकरे, प्रविण दाञे एपीआय मेहुणबारे, नानासाहेब पवार दडपिंप्री,ए.टी.पवार डाॕ.नितीन देवरे,मा,रमेश आवटे आनंदा पवार बाबासाहेब पवार,संजय ठाकरे,प्रमोद पाटील,निलेश राजपूत,प्राचार्य बिल्दिकर सर,अरुण पाटील,देवा राजपूत विमानतळ,आकाश पोळ,ए.व्हि.तात्या पाटील तसेच रा.राजपूत करणी सेनेचे अभयसिंह राजपूत, वीरेंद्रसिंह (टोनू) राजपूत,दिलीप घोरपडे,सुनिल ठोके,नितीन पाटील,महेंद्रसिँह शिसोदे,सुचिञाताई पाटील,सरदार पप्पू राजपूत,सिध्दार्थ राजपूत,लवेश राजपूत,विशाल विजयसिंह राजपूत, दिनेश घोरपडे,युवराज राजपूत ,विरेंद्रसिंह राजपूत दसेगाव,विजयसिंह पवार वरखेडे,किशोर साळुंखे,अभयसिंह पवार,बबडूदादा राजपूत, अमोल पवार,विशाल राजपूत,हर्षल पवार,निलेश राजपूत,नयनसिंह राजपूत,रोशन राजपूत,पृथ्वीराज भाऊसाहेब,हरपालसिंह राजपूत,शाम सूर्यवंशी,टीकू राजपूत कुंझर,किशोर राजपूत,उदयसिंह राजपूत,नितीन मोरे,भूषण राजपूत इत्यादी असंख्य महाराणा प्रेमी उपस्थित होते तर महाराणा प्रतापसिंह यांची जयंती भव्य मिरवणूक तिथीनुसार 29 मे रोजी निघणार असल्याचे यावेळी आयोजकांनी जाहीर केले
