अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगांव(प्रतिनिधी)–आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने मौजे-कुंझर ता.चाळीसगांव येथील 43 शेतक-यांना पांझण डावा कालवा संपादन झालेल्या शेतजमीनीचा मोबदला वाटप नोटीस प्रांत अधिकारी यांच्या हस्ते जमीनधारकांना देण्यात आली.
आमदार मंगेश चव्हाण यांनी तालुक्याच्या लोकहितार्थ सार्वजनिक कामासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा व अथक प्रयत्नाने मौजे-कुंझर ता.चाळीसगांव येथील 43 शेतक-यांना पांझण डावा कालवा करीता संपादन झालेल्या शेतजमीनीचा अंतिम मोबदला र.रु.1,68,59,477/- रुपये मात्र संपादन संस्था कार्यकारी अभियंता धुळे मध्यम प्रकल्प विभाग धुळे यांचे कार्यालयाशी संपर्क साधुन प्राप्त करुन देण्यात आल्याचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी सांगितले आहे.
मौजे कुंझर येथील संपादीत जमीन मालक यांना दि.09 मे 2025 रोजी मंजुर निवाडयानुसार मोबदला वाटप नोटीस प्रमोद हिले भुसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चाळीसगांव यांचे मार्फत देण्यात आलेली आहे.
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील,तालुका कृषी अधिकारी अभिषेक लगड,महसूल सहायक गिरीश पाटील,तलाठी आनंद शिंदे हे उपस्थित होते.
