Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)— शहर पोलीस स्टेशनने अपहरित अल्पवयीन मुलीचा मध्यप्रदेशातून शोध घेऊन तिला सुखरूप परत आणत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईबद्दल पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 87/2026, कलम 137(2) बी.एन.एस. अंतर्गत दिनांक 7 मार्च 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. चांदणी चंदूडिया (वय 15 वर्षे), रा. धुळे रेल्वे लाईनजवळ, चाळीसगाव हिला तिच्या पालकांच्या कायदेशीर संरक्षकत्वातून अज्ञात व्यक्तीने फूस लावून अथवा पळवून नेल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
सदर प्रकरणाचा तपास चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत असताना पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण व चिकाटीने तपासाची सूत्रे हाताळली. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी मध्यप्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील दुर्गम भागात जाऊन शोधमोहीम राबविली.
या शोधमोहीमेत अपहरित अल्पवयीन मुलगी चांदणी चंदूडिया हिचा यशस्वीरित्या शोध घेण्यात आला. त्यानंतर तिला सुरक्षितपणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे आणून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. पुढे तिचा ताबा नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकाते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी ठाकूर यांच्या आदेशान्वये आणि पोलीस निरीक्षक अमितकुमार मणेल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
अपहरित मुलीचा मध्यप्रदेशातून शोध घेऊन तिला सुखरूप परत आणल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून, या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
