Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
अव्वाच्या सव्वा दराने विक्री;पालक त्रस्त
चाळीसगाव (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच चाळीसगाव शहरात शालेय गणवेश विक्रीत मोठ्या प्रमाणावर मनमानी होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. काही शाळांकडून पालकांना ठराविक दुकानांतूनच गणवेश खरेदी करण्यास सांगितले जात असल्याने पालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, बाजारात उपलब्ध असलेल्या गणवेशाच्या तुलनेत संबंधित दुकानांमध्ये त्याच दर्जाच्या गणवेशासाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. अनेक ठिकाणी गणवेश, स्वेटर, टाय, बेल्ट आणि इतर साहित्याचे दर सामान्य बाजारभावापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय पालकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळा प्रशासन आणि संबंधित दुकानदारांमध्ये संगनमत असल्याचीही चर्चा पालकांमध्ये रंगू लागली आहे.
पालकांनी शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडे या प्रकरणाची चौकशी करून गणवेश विक्रीत पारदर्शकता आणण्याची मागणी केली आहे. तसेच कोणत्याही एका दुकानाची सक्ती न करता पालकांना त्यांच्या पसंतीच्या दुकानातून गणवेश खरेदी करण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे, अशी मागणीही पालक करत आहे.
.
विशेष दुकानांमधून गणवेश खरेदी करण्याची सक्ती शाळांनी पालकांना करू नये तसेच अशी सक्ती शाळा करत असतील तर पालकांनी तक्रार दिल्यास संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल – विलास भोई(गटशिक्षण अधिकारी चाळीसगाव)
