अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-भुसावळ शहर पोलीस ठाण्यातून प्रशासकीय बदली झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) विजय श्रीकृष्ण माळी यांनी आज चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला.
यापूर्वी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची मेहुणबारे पोलीस ठाण्यात बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्या अनुषंगाने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या विजय माळी यांची चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.
आज त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामकाजाची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नियुक्तीमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
