अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला रोखण्यात यश रोज 10 ते 15 रुग्ण आढळत होते आता एकेरी दुकेरी रुग्ण सापडत आहेत लवकरच दौंड शहर कोरोना मुक्त होणार दिं. 07/08/2020 रोजी एकुण 29 रूग्णांचे घशातील स्राव तपासणी साठी पुणे येथे प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते त्यांचे रिपोर्ट आज दिं. 08/08/2020 रोजी प्राप्त झाले. त्या पैकी एकूण 2 रूग्ण पॉजीटीव्ह आले आहेत.यामध्ये एक पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. शिवाजी चौक-1सरस्वती नगर-1 असे दोन रूग्ण आहेत.30 ते78 वयोगटातील रूग्ण आहेत. अशी माहीती उपजिल्हा रूग्णालय दौंड वैद्यकीय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.
