परिसरात दशहत माजविणा-या सराईत गुन्हेगारांना अटक,पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा 2 ची कारवाई….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी सनी घावरी
(निगडी )गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई
दिनांक 25/11/2020 रोजी रात्री ८.३० वा.चे सुमारास अजय प्रकाश सोनवणे वय २४ वर्षे रा. ओटास्किम हे आपले मोटर सायकलवरून जात असतांना ओटारिकम निगडी येथील स्वामी विवेकानंद शाळेसमोरील चौकात मुले खेळत असल्याने मोटर सायकलचा हॉर्न वाजविला त्या कारणावरून चिडुन आरोपी राजु वाले, अमोल वाले व आनंद वाले यांनी भांडण काढुन लोखंडी कोयते व तलवारी घेवुन येवून अजय सोनवणे व त्याचा मित्र प्रसाद क्षिरसागर यांना जिवे मारन्याच्या उदेशाने त्यांचेवर वार करून गंभीर जखमी केले व परिसरात दहशत माजविल्याने अजय सोनवणे यांनी निगडी पोलीस ठाणेत फिर्याद दिली फिर्यादीवरून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न,आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आल्याने
मा.वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या गुन्हे शाखेस सुचना दिल्या होत्या.सदर गुन्हयाचा गुन्हे शाखेकडून समांतर तपास करीत असतांना पोलीस निरीक्षक श्री शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध सुरु असतांना पोलीस उपनिरीक्षक एस डी निलपवेवार, पोलीस हवालदार शिवानंद स्वामी, दिपक खरात, पोलीस नाईक जयवंत राऊत, विपुल जाधव, जमीर तांबोळी, अजित सानप, शिवाजी मुंढे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारा कडून मिळाले बातमीवरून तांजीक विश्लेषण विभागाचे मदतीने गुन्हयातील पाहीजे असलेले आरोपी अमोल बसवराज वाले वय २३ वर्षे मेघराज संजय वाले वय 25 वर्ष दोघे रा. ओटास्किम निगडी यांना खेड राजगुरुनगर परिसरातुन सापळा लावुन अटक केले व गुन्ह्याच्या तपासासाठी निगडी पोलीस ठाणेकडे हजर केले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस
आयुक्त श्री रागनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्री सुधीर हिरेमठ, सहाय्यक
पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट 2
चे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक संजय निलपवार, पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी,दिपक खरात, केरामा माने, प्रमोद वेताळ, वसंत खोमणे, मपोहवा उषा दळे, दिलीप चौधरी, विपुल जाधव, जगीर वांबोळी, जयवंत राऊत, नामदेव राऊत, अजित सानप, शिवाजी मुंढे तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार शेटे, माळी यांचे पथकाने केली आहे.