
संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी) – राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठित अशी मुंबई येथील डॉ. होमी भाभा फॉउंडेशन स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. सदर स्पर्धेत गुड शेपर्ड अकॅडमीचा इयत्ता 10 वीचा विद्यार्थी चि. अजिंक्य विजय पगारे याने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावत अलौकिक यश संपादन केले. या यशामुळे त्यास भारतातील नामांकित अंतराळ संशोधन संस्था इस्रो (ISRO) येथील शास्रज्ञासोबत शिकण्याची व राहण्याची संधी मिळणार आहे व डॉ. होमी भाभा फॉउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती देखील मिळणार आहे.
अजिंक्यने भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत रजत पदक प्राप्त केले असुन विविध स्पर्धा परीक्षामध्ये यश संपादन केले आहे. त्याच्या या नेत्रदिपक यशाबद्दल शाळेने त्यास बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर चा पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
अजिंक्य यास शाळेचे प्राचार्य श्री. डॅनियल दाखले सर, विज्ञान शिक्षक श्री. शैलेंद्र मराठे सर व नीलिमा मोरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस प्रोत्साहन व शुभेच्छा दिल्या.