अन्नदानातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
प्रतिनिधी: लखन शिंदे
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
प्रतिनिधी लखन शिंदे
दौंड(प्रतिनिधी)-दि. 12 एप्रिल 2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त मंडप साऊंड लाईट चालक-मालक कामगार संघटनेतर्फे भव्य अन्नदान वाटपाचे आयोजन करण्यात आले.
दौंड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता हा अन्नदानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी परिसरातील नागरिकांसह आठवडी बाजारासाठी आलेल्या बाहेरील नागरिकांनीही अन्नदानाचा लाभ घेतला. शेकडो बांधवांना प्रेमाने भोजन देत समाजसेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदनाने करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अभिवादन करत त्यांच्या विचारांना उजाळा दिला.“शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या डॉ. बाबासाहेबांच्या संदेशाचे पालन करत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे हे आपले कर्तव्य असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी संघटना सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मंडप साऊंड लाईट चालक-मालक संघटनेच्या सर्व कामगार व मालकांनी विशेष परिश्रम घेतले.
