अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चितेगाव–शामवाडी अंतर्गत गावांमध्ये एकूण ८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, त्यांचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील होते.
ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत निधी मंजूर करून सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी एकमताने या उपक्रमास मंजुरी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे महत्त्व, त्यांचे फायदे तसेच भविष्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाची सुरुवात कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्रीकृष्ण भोसले यांनी केली. यावेळी विजयकुमार ठाकूरवाड यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक बापूराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आला, तर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांचा सत्कार चिंतामण कवडे व सुधाकराव देशमुख यांनी केला.
या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी सौ. सुनीता चौधरी, सरपंच सौ. प्रभावती गायकवाड, माजी सरपंच रावसाहेब भोसले, दीपक कवडे, भगवान भोसले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुनील मोरे, बापू पवार तसेच विवेक भोसले, संदीप शितोळे, योगेश ठाकरे, अनंतराव भोसले, शेखर गायकवाड, कैलास मोरे, भैया गायकवाड, शरद सोनवणे, बापू मरसाळे, बिपिन गायकवाड आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
