
संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगाव शिवसेनेच्या वतीने नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत चाळीसगाव तालुक्यातील 61 कॉमन मॅन लोकांचा सन्मान सोहळा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला.यात चाळीसगाव तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक, बांधकाम कामगार, घरकाम करणाऱ्या महिला ,भाजीपाला विक्रेते, महिला बस ड्रायव्हर ,वारकरी, रक्तदाते नगरपालिका सफाई कर्मचारी, अशा सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वांचा सन्मान सोळा राजपूत मंगल कार्यालय येथे पार पडला.
यावेळी रक्तदान करण्याचा विक्रम करणारे दिपक शुक्ल,५३वेळा रक्तदान केलेले बीबीएन-२४न्युज चे संपादक विजय गवळी,प्रितेश कटारीया,पंकज पाटील यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण,शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील,शिवसेना नेते पप्पूदादा गुंजाळ,शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले,डॉक्टर सुनील राजपूत,रामचंद्र जाधव,भाऊसाहेब पाटील, समाधान पाटील तसेच शिवसेना तालुका अध्यक्ष राहुल पाटील, शहरप्रमुख सागर चौधरी,शुभम राठोड,शेखर गवळी,सोमनाथ चौधरी,महेंद्र पाटील,मनीषा ताई महाजन,प्रतिभाताई पवार,अनिता ताई शिंदे ,सुवर्णाताई राजपूत,विनोद जाधव,आकाश जाधव,दीपक कुमावत,दिनेश कासार,जय राजपूत,रोहित नवले,दीपक गुंजाळ,संजय पाटील,त्रिशूल गोसावी यांच्यासह शिवसेना,युवा सेना,महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.